google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोबाईलवरून बँकेतील ८ ९ हजार काढून फसवणूक

Breaking News

मोबाईलवरून बँकेतील ८ ९ हजार काढून फसवणूक

 मोबाईलवरून बँकेतील ८ ९ हजार काढून फसवणूक


सांगोला / प्रतिनिधी ऑनलाईन क्लासेस चालू असल्याने वडिलांनी मुलाकडे दिलेल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने ८ ९ हजार ८ ९ ५ रुपये काढून घेत फसवणूक केली ही घटना दि २४ रोजी घडली असून संभाजी नारायण आगलावे रा अगलावेवाडी ( जवळा ) ता . सांगोला यांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध पोलीसात तक्रार दिली आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , संभाजी नारायण आगलावे ( रा . आगलावेवाडी जवळा , ता . सांगोला ) यांनी स्वतःचा मोबाईल मुलाकडे त्याच्या ऑनलाईन क्लासेससाठी ठेवला होता . मुलगा रोहन हा सदर मोबाईलवरती फेसबुक अकाऊंट ओपन करून त्यावर व्हिडीओ पाहत होता . यावेळी व्हिडिओच्या खाली ८६ ९ रुपये जिंकले आहेत , असा मेसेज आला . त्यानंतर रोहन याने समोर आलेल्या लिंकवर क्लिक केले असता , बँक अकाऊंट वरील ८६ ९ रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आल्यामुळे मुलगा रोहन याने परत गुगलवरून इस्लांड बँकेचा कस्टमर केअर नंबर प्राप्त करून त्यावर कॉल केला असता , सदरचा नंबर बंद लागत होता . दोन मिनिटांच्या अंतराने फिर्यादिस ८१०१ ९९ ६२२०४ या नंबरवर माझा मोबाईल नंबर ९ ०७५४७४१२४ यावर फोन करून अज्ञात व्यक्तीने ' आपको आपके पैसे चाहिये , तो आप हम जो नंबर बता रहे है वही नंबर दबाव ' असे म्हणाल्याने मुलगा रोहन यांनी त्याने सांगतील , त्याप्रमाणे मोबाईलची बटने दाबत गेला . यावेळी फिर्यादीचे अकाऊंट वरील ४४ हजार १३ रुपये प्रमाणे दोन वेळा कट होऊन गेले . त्यामुळे सदर अकाऊंटवरून सुरवातीचे ८६ ९ व त्यानंतर दोन वेळा कमी झालेले ४४ हजार १३ रूपये असे एकूण ८ ९ हजार ८ ९ ५ रुपये रक्कम वरील नंबर वरील अज्ञात इसमाने तोतयागिरी करून फसवून काढून घेतले . यानंतर दि . २५ रोजी सकाळी ८.४५ वाजता परत नंबर वरती ८१०१ ९९ ६२२४ या मोबाईल नंबर वरून फोन करून आपने अगर पुलिस को बताया , या कंम्प्लेट की तो आपके खाते से पुरी रक्कम निकाली जायेगी अशी फोनवरून धमकी दिली . याबाबत फिर्यादी संभाजी नारायण आगलावे यांनी फसवणूक करणाऱ्या मोबाईल नंबरच्या अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .

Post a Comment

0 Comments