आठवीतील मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली..! - क्राईम एफ.आय.आर.
पुणे दि. १३ (प्रतिनिधी)-: पुण्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका चालु आहे. मागील काही दिवसा पासुन बरेच गुन्हेगारी घटना घडल्यानंतर काल पुन्हा परत पुणे येथे एका घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि कबडीपट्टू असलेल्या मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. हृषिकेश भागवत हे आरोपीचे नाव आहे.
या घटनेबद्दल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी काल सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावासाठी मैदानात आली होती. तेव्हा आरोपी हृषिकेश हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकी वाहनावरून मैदानात आला आणि काही समजण्याच्या पहिलेच त्याने कोयत्याने आणि चाकूने सपासप विद्यार्थिनीवर वार करत त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्या अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणींना धमकावून तेथून पळून लावले आणि नंतर आरोपी देखील घटनास्थळावरून पसार झाला.
यानंतर जखमी अवस्थेतील त्या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित करण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार करून पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत. तसेच या घटनास्थळी आम्हाला पिस्तूल देखील आढळून आल्याची माहिती देखील पोलिसांनी सांगितलेली.
“काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स बिबवेवाडी परिसरात गेली होती. तेव्हा मुख्य आरोपी सह चौघे जण दुचाकी वाहनावरून तिथे आले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने सपासाप वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात आली. आरोपी हा मयत मुलीच्या घराशेजारी मागील पाच वर्ष पासुन होता. मात्र साधारण एका वर्षभरापूर्वी दुसरी ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील असल्याचे समजते आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे समजते,अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितली आहे.
तर फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी मुलीच्या मामांनी केली आहे. “तीन महिन्यापूर्वी मुलीस त्रास दिला होता.तेव्हा मी त्याला समज दिल्यानंतर तो शांत झाला होता. मात्र काल त्याने तिच्यावर वार करून खून केला.आरोपीला अडविण्याचा प्रयत्न तेथील मुलीनी केला.मात्र तो वार करीत राहिला. ४४ वार तिच्यावर त्याने केला आहेत.यामुळे या आरोपीचे कोणीही केस लढू नये आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून लवकरात लवकर न्याय मिळावा”, अशी मागणी मुलीच्या मामांनी केली आहे.
0 Comments