मुंबई : राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्री मंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठांना दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मार्गदर्शक सूचना
विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.कोरोना लसीकरण पूर्ण झालेले नसतील तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवावे ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुनच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी विद्यापीठ, महाविद्यालयांना दिला आहे. परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करावी लागेल. जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांनी करुन द्यायची आहे. टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याची सूचना.
0 Comments