मंगळवेढा व सांगोला येथील जप्त वाळू साठ्याचा आज लिलाव; वाळू साठ्याची पाहणी करून लिलावात भाग घ्या
उपविभागातील कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव आज दि.२९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
मंगळवेढा उपविभागातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत मंगळवेढा तालुक्यातील मौजे सिद्धापूर ६१०.२० ब्रास शासकीय किंमत सुमारे २२ लाख ५७ हजार ७४०तर सांगोला तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम आवारातील १३० ब्रास , शासकीय किंमत ४ लाख ८१ हजार इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावयाचा आहे. अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी मंगळवार दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग मगळवेढा येथे सादर करावेत. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहनही समिंदर यांनी केले आहे.
0 Comments