अरे व्वा..., किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले हे करत असतानाच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कोविड काळात 40 मृतदेह लपवण्याचा घोटाळयाची चौकशी सुरू आहे तसेच आरोग्य समितीतील कोट्यवधीचा घोटाळा हे पुढचे लक्ष असेल असे सांगितले त्याच पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख महापौर श्रीकांचना यंनम यांची उपस्थिती होती.
सोमवारी सर्व वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आपल्या काँग्रेस भवनातील कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अरे वा हा तर भाजपचा सत्तेतील घोटाळा आहे, किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा निश्चित करावा त्यांना लोक दुवा देतील. भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मग या भ्रष्टाचाराला भाजपचे पदाधिकारी जबाबदार नाहीत का? सोमय्या यांनी पुन्हा सोलापुरात यावे आणि या विषयाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करावा अशी अपेक्षा प्रकाश वाले यांनी व्यक्त केली काय म्हणाले प्रकाश वाले पहा हा व्हिडिओ....
https://youtu.be/rnf6MUYkEcc
0 Comments