google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहराचा सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर आजचा छ . शिवाजी महाराजांच्या पुतळा , चबुतरा उदघाटन सोहळा नगरपालिकेने स्थगित करावा : नगरसेवक सुरजदादा बनसोडे

Breaking News

शहराचा सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर आजचा छ . शिवाजी महाराजांच्या पुतळा , चबुतरा उदघाटन सोहळा नगरपालिकेने स्थगित करावा : नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 शहराचा सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर आजचा छ . शिवाजी महाराजांच्या पुतळा , चबुतरा उदघाटन सोहळा नगरपालिकेने स्थगित करावा : नगरसेवक सुरजदादा बनसोडे


सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहारातील छ . शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम प्रगतीपथावर सुरु असून अचानक पुतळा चबुतराच्या उदघटनाचे नियोजन नगरपालिकेने केले आहे . परंतु छ . शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्या अगोदर उदघाटन सोहळ्यास शिवप्रेमी मंडळ आणि छ . शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्वच बहुजन बांधवांचा विरोध आहे . आणि तो विरोध असणे योग्यच आहे , कारण त्या त्यांच्या छ . शिवाजी महाराजांविषयी आदरात्मक भावना आहेत . सांगोला शहर हे शांतता प्रिय व सामाजिक सलोखा , धार्मिक ऐक्य जोपासणारा तालुका आहे . ह्या शहरामध्ये कांही राजकिय स्वार्थ असणारे मंडळी , त्या उदघाटन सोहळ्याचे राजकीय स्वार्थापोटी भांडवल करीत आहेत . तरी सांगोले शहरातील छ . शिवाजी महाराजांच्या नावाचे कोणी जातिय तेढ निर्माण करण्यासाठी व शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करु नये . सांगोला नगरपरिषदेचे सर्व सदस्य व शिवप्रेमी मंडळ सदस्य , तसेच राजकीय काही प्रमुख नेते मंडळी यांनी चर्चा करुन , समन्वय साधून उदघाटन सोहळ्यावर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढावा , सांगोले शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे कारण छ . शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्वच मावळ्यांचे ते कर्तव्यच आहे . म्हणून नगरपालिकेने लोकांच्या Yorang भावना समजून घेवून सदरचा उदघाटन कार्यक्रम स्थगित करुन , पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे , आणि सांगोले शहराची शांतता , सुव्यवस्था व सांगोले शहराचा जातीय सलोखा अबाधित ठेवावा . असे आवाहन आरपीआ जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments