सांगोला शहरात डासांचे प्रमाण वाढले . नगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
सांगोला ( प्रतिनिधी ) : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे . तसेच गवत ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे . यामुळे डासांचे प्रमाण खूप वाढले आहे . डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . मात्र नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . शहरात ताप , डोकेदुखी , अंगदुखी रुग्णांची संख्या वाढली आहे . डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे . खुल्या भूखंडावर पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि सांडपाण्याचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे . नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य पावले उचलून संपूर्ण शहरात वेळोवेळी धुरफवारणी , औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे .
0 Comments