निज्जपणाचा कळस ! अल्पवयीन बहिणीने प्रियकराच्या मदतीने केली सख्या लहान भावाची हत्या
नागपुर येथून एक अतिशय धक्कादायक बातमी हाती येथे आहे . वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दृगधामना येथे एका अल्पवयीन बहिणीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच सख्या लहान भावाची हत्या केली असल्याचा भयनाक प्रकार उघडकीस आला आहे .
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार घरी मोठे कोणी नसल्याचे पाहून प्रियकर घरी आला होता. मात्र, अल्पयीन बहिणीचा 12 वर्षीय भाऊ घरी होता. तो खेळण्याच्या नादात होता. त्याचवेळी अल्पवयीन बहिण आणि तिचा प्रियकर नको त्या अवस्थेत होते. 12 वर्षीय भावाने या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे ते दोघे घाबरले होते. त्या दोघांनी 12 वर्षीय मुलाला समजावले होते. याबाबत घरच्यांना काही सांगू नको. मात्र, मी सांगणार यावर तो ठाम होता. त्यामुळे दोघांनी त्याला दम भरला. तरीही तो ठाम राहिला.
त्यानंतर प्रियकराने त्याचा ओढणीने गळा आवळा. यातच भावाचा मृत्यू झाला,त्यानंतर प्रियकर त्याच्या घरी पळून गेला. भाऊ बेशुद्ध पडला होता. बहिणीला काय करावे तेच समजत नव्हते. तिने भावाचा मृत्यू वेगळ्या कारणाने झाल्याचा कांगावा केला. घरी परतलेल्या आईवडिलांनी घाबरून आपल्या 12 वर्षीय मुलाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकर याला अटक केली आहे. तसेच भावाच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.

0 Comments