google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जेलमधून बाहेर पडताच 2 खुनाची केली तयारी , एकाची केली हत्या , सोलापुरात खळबळ

Breaking News

जेलमधून बाहेर पडताच 2 खुनाची केली तयारी , एकाची केली हत्या , सोलापुरात खळबळ

 जेलमधून बाहेर पडताच 2 खुनाची केली तयारी , एकाची केली हत्या , सोलापुरात खळबळ


सोलापूर, 19 ऑक्टोबर : पत्नीच्या हत्येमुळे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने  आणखी एक खून केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर  तालुक्यातील वडापूर इथं घडली आहे.हत्येमागे चारित्र्यचा संशय हेच कारण असल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीने जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने दोन खुनाची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसिद्ध पुजारी असं या 64 वर्षीय आरोपीचं नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मयत ज्ञानदेव नागणसुरे हे आपल्या घराकडे निघाले होते.


त्यावेळी रस्त्यात गाठून आरोपी आमसिद्ध पुजारी याने धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानदेव नागणसुरे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी आमसिद्ध पुजारी हा फरार झाला. HDFC बँकेतील NRI चे अकाऊंट लुटण्याचा प्रयत्न, 3 कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक आरोपी आमसिद्ध पुजारी याने 2009 साली चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती.


डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः हुन पोलिसात देखील हजर झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आमसिद्ध काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, गावी आल्यापासून आमसिद्ध हा हत्येच्या तयारीत होता.


'मला आणखी दोन खून करायचे आहेत' असं तो नेहमी सांगत होता. यातूनच त्याने ही हत्या केल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. आमसिद्ध हा अद्याप फरार असल्याने मृत ज्ञानदेव नागणसुरे याचे कुटुंबीय देखील भीतीच्या छायेत आहेत. वडनगरचा सुपुत्र ते भारताचे पंतप्रधान... जाणून घ्या नरेंद्र मोदींच्या यशाचे रहस्य दरम्यान, फरार आरोपी आमसिद्धला ताब्यात घेण्यासाठी पोलिसाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली

Post a Comment

0 Comments