google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान परिषदेचे हे आहेत संभाव्य उमेदवार ; ऐनवेळी हा नेता येणार का समोर?

Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान परिषदेचे हे आहेत संभाव्य उमेदवार ; ऐनवेळी हा नेता येणार का समोर?

 राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान परिषदेचे हे आहेत संभाव्य उमेदवार ; ऐनवेळी हा नेता येणार का समोर?


सोलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या महिन्याभरात विधान परिषदेचे निवडणूक जाहीर होईल. नुकताच  जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाने मतदारांची संख्या घेतली, सुमारे 415 मतदार असून त्यापैकी तब्बल तीनशे मतदार हे भारतीय जनता पार्टी समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या  इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचं बोलले जात आहे. मात्र विधान परिषद निवडणूक ही पक्षावर नसून घोडेबाजारावर चर्चेत राहते जो जास्त लक्ष्मी दर्शन देतो त्याला जास्त मतदान  होतं असे मागील अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं.


 2015 सालच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी सध्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची 300 मत आहेत त्याच पद्धतीने काँग्रेस-राष्ट्रवादीची सुमारे अडीचशे ते तीनशे मतं होती तरीही भारतीय जनता पार्टी समर्थक प्रशांत परिचारक यांचा विजय झाला. त्यांनी त्या निवडणुकीत मोठा खर्च केला होता अशी चर्चा ऐकण्यास मिळाली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार दिलीप माने यांचं नाव आघाडीवर आहे त्यानंतर माजी आमदार राजन पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, पंढरपूरचे कल्याणराव काळे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते. महेश कोठे यांचेही नाव चर्चेत असला तरी ते विधानपरिषद लढवण्यास इच्छुक नसल्याच समजतं त्यामध्ये दिलीप माने यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक आहे. 


 परंतु दिलीप माने यांना खुद्द जिल्हाध्यक्ष काका साठे यांनीच विरोध केला असल्याची चर्चा आहे, त्याचबरोबर त्यांचं महेश कोठे यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीनंतर  जास्त जमत नाही. इकडे काँग्रेसमध्ये शिंदे फॅमिली कितपत सहकार्य करणार हा सुद्धा मुद्दा आहे. तरीही राष्ट्रवादी कडून तेच तगडे उमेदवार होऊ शकतात, त्यांची तयारी सुद्धा आहे,  राष्ट्रवादी काँग्रेस ऐनवेळी हुकुमाचा एक्का म्हणून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना सोलापूरच्या मैदानात उतरवतील अशीही चर्चा सोशल मीडिया मधून आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही करून विधान परिषदेमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी कडून प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची माहिती असून अपक्ष चिन्हावर ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा माध्यमातून वाचण्यात आली.

Post a Comment

0 Comments