राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सभासदांना दिवाळी बोनस भेटवस्तू देण्याचा निर्णय
सांगोला / प्रतिनिधी : राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल संपन्न झाली. यावेळी पतसंस्थेचा वार्षिक लेखाजोखा सभासदांसमोर मांडण्यात आला. तसेच चालू वर्षी दिवाळीनिमित्त सभासदांना बोनस भेटवस्तू देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामध्ये साखर 3 किलो, गरा 2 किलो, तेल 1 किलो, डाळ 1 किलो, मोती साबण 1 अशा प्रकारच्या वस्तू देण्यात येणार आहेत.
तसेच सभासदांनी येताना शेअर्स सर्टिफिकेट, आधार कार्ड व पिशवी घेऊन तहसील कार्यालयासमोर राजमाता महिला पतसंस्था याठिकाणी येण्याचे आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये थकीत कर्जदार व त्यांचे जामीनदार यांना या वस्तूंचे वाटप होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. यावेळी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, पतसंस्थेच्या चेअरमन सौ. अप्सराताई ठोकळे, व्हा. चेअरमन सौ. प्रियांका श्रीराम, सर्व संचालक मंडळ, सचिव सौ. मनीषा हुंडेकरी व सभासद उपस्थित होते.
0 Comments