आ.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात 650 जणांची तपासणी
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी, सांगोला शहर, लायन्स मथुराबाई फतेहचंद दमानी हॉस्पिटल सोलापूर, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू ऑपरेशन, मोफत हृदयरोग तपासणी, मोफत ईसीजी व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे करण्यात आले होते.
नगरसेवक सोमेश यावलकर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 150 जणांची नेत्र तपासणी, 70 जणांना मोफत चष्मे वाटप, 100 जणांची शुगर तपासणी, 60 जणांचा ईसीजी, 85 जणांचे कोविड लसीकरण, 185 जणांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराच्या ठिकाणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, नगरसेवक सचिन लोखंडे सोमेश यावलकर, आनंद घोंगडे, अभिजित नलवडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments