स्व. मा. आम. गणपतरावजी देशमुख यांच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन : नगरसेवक सुरज दादा बनसोडे
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्याचे मा. आम. स्व. डॉ. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे 3 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी दिवशी काही कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रमुख नेतेमंडळी व काही पदाधिकारी ग्रामीण भागातले सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक या क्षेत्रातील मान्यवरांना अंत्यविधी दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे संधी मिळाली नाही. तरी माननीय गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांच्या आलेल्या अनुभव व सर्व स्तरातील सर्वसामान्य माणसापासून अधिकारी व राजकीय नेते मंडळी यांना केलेली मदत ही प्रत्येकाने जाणीव म्हणून ती व्यक्त करण्याची व शोक सभेच्या माध्यमातून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे कोरोनाचे नियम पाळून, शासनाचे आदेश पाळून शोक सभेचे आयोजन शनिवार दि 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आले आहे.तरी सांगोला तालुक्यातील आबासाहेब प्रेमी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आरपीआयचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी केले आहे.
0 Comments