यलमर मंगेवाडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :- 7 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, यलमर मंगेवाडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे उदघाटन यशवंत सेनेचे तालुका अध्यक्ष आनंदराव मेटकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमास मंगेवाडी गावातील व पंचक्रोशीतील सतीश येलपले सर, ग्रामपंचायत सदस्य सागर खरात, अतुल गुजले, नवनाथ कांबळे, महादेव कांबळे, भुषण पाटील, करण मस्के, कृष्णा कोळेकर, अक्षय जाधव, गणेश मंडले, अमोल चोरमले, समाधान चव्हाण, पिंटू चोरमले, बीरा जावीर, आरविंद ढोणे, धनाजी जावीर, महेश चोरमले, अक्षय येलपले, पप्पू विभुते, लक्ष्मण कोकरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा इतिहास व त्यांचे कार्य नवीन पिढीस कसे मार्गदर्शक आहे हे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी आनंदराव मेटकरी मित्र परिवार यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
0 Comments