पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याण साधले - प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले
सांगोला... जगामध्ये आजवर अनेक शासक होऊन गेले. तुलनेत स्त्री शासक कमीच झाल्या. स्त्री-पुरुष समतेची भाषा करणाऱ्या या आधुनिक जगात आजही स्त्रीचे नेतृत्व मान्य केले जात नाही. अशा परिस्थितीत शासनकारभार हाती घेणे व तो यशस्वीपणे चालविणे ही बाब दुर्मिळ अशीच आहे. केवळ शासन केले नाही तर लोककल्याण साधले असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले यांनी व्यक्त केले. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दिपक रिटे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. संभाजी शिंदे, प्रा. डॉ. दिलीप कसबे, प्रा. डॉ. किसन माने, प्रा. रावसाहेब गडहिरे, प्रा. डॉ. शुद्धोदन कदम, प्रा. अशोक कांबळे, प्रा. सुशील रणदिवे, प्रा. मनोहर वाघमोडे, प्रा. अविनाश लोखंडे, स्वप्नील शिंदे, श्रीम. विमल माने, दत्तात्रय भजनावळे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. धैर्यशील भंडारे यांनी केले तर आभार प्रा. अशोक वाकडे यांनी व्यक्त केले.
0 Comments