google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गोमेवाडीत पत्नीने केला पतीचा खून : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

Breaking News

गोमेवाडीत पत्नीने केला पतीचा खून : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

 गोमेवाडीत पत्नीने केला पतीचा खून : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल


 

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे चरित्र्याचा संशयावरून पत्नीवर संशय घेणाऱ्या नवऱ्याचा पत्नीनेच खुन केल्याची घटना घडली असून यामुळे परीसरामध्ये खळबळ माजली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, गोमेवाडी येथील श्रीकांत श्रीपती खरात (व.व.४४ रा. गोमेवाडी) हा पत्नी वैशाली श्रीकांत खरात (व.व.३५, रा.गोमेवाडी) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज दिनांक २९ रोजी सकाळी ८.२० च्या दरम्यान श्रीकांत याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली हिला मारण्यासाठी चाकूने मारण्यासाठी आला असता यावेळी दोघांच्या मध्ये झटापट होवून पत्नी वैशाली हिने पत्नी श्रीकांत याच्या हातातील चाकू घेवून पतीवर वार केला. तसेच त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यावेळी पती श्रीकांत याचा मृत्यू झाला.


सदरच्या घटनेबाबत गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील याने आटपाडी पोलिसात आरोपी वैशाली श्रीकांत खरात हिचे विरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत पत्नी वैशाली हिच्यावर भा.द.वि.स. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्रीमती पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट देवून सूचना व मार्गदर्शन केले असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बी.आर.निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments