अन्न पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांचा सोलापूर दौरा...
2 ऑक्टोंबर रोजी समता परिषद व राष्ट्रवादीची संयुक्त बैठक...
बार्शी (प्रतिनिधी)राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ हे सोलापूर दौर्यावर येत आहेत. दोन ऑक्टोंबर रोजी हा दौरा नियोजित असून सोलापूर येथे दुधनी या गावी सात लिंगप्पा म्हेत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळा व समाधीस्थळ लोकार्पणाचा सोहळ्यासाठी येथे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत . त्याचबरोबर याच दिवशी सोलापूर जिल्हा महात्मा फुले समता परिषद व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांची संयुक्त बैठक सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी होणार आहे तरी या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील महात्मा फुले समता परिषद सर्व शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष पदाधिकारी व भुजबळ प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब खारे यांनी केले आहे. तसेच बार्शी समता परिषद शाखेच्यावतीने ही सोलापूर येथे छगनरावजी भुजबळ हे महाराष्ट्र सदन प्रकरणी निर्दोष निघाल्यामुळे विशेष सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती समता परिषदेचे बार्शी शहर अध्यक्ष नितीन भोसले यांनी दिली.
0 Comments