google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले , मरिआई चौक ओलांडून दाखवा

Breaking News

सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले , मरिआई चौक ओलांडून दाखवा

 सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले , मरिआई चौक ओलांडून दाखवा


काही दिवस गप्प असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सोमवारी तीसपेक्षा अधिक वाहनांचा ताफा घेऊन मरिआई चौकात येऊन बरडेंच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

सोलापूर: जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार, दोन खासदार असून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व महापालिकेचा महापौर आमचाच आहे.शिवसेनेचा जिल्ह्यात एकच आमदार असून तोही भाजपच्या पाठिंब्यावर आलेला आहे, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी लगावला.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तदाखल श्री. देशमुख बोलत होते. राज्य सरकारविरोधात आंदोलन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात येऊन मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अवहेलना केली होती. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्त बरडे यांनी त्यांना फोन करून "मुख्यमंत्री तथा शिवेसना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आमचे दैवत असून त्यांच्या बाबतीत असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तुम्ही मरिआई चौक ओलांडून दाखवा, मी सांगोल्यातील तुमच्या गावात येऊन त्याला प्रत्युत्तर देणार' असे आव्हान दिले होते. त्यानंतर काही दिवस गप्प असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सोमवारी तीसपेक्षा अधिक वाहनांचा ताफा घेऊन मरिआई चौकात येऊन बरडेंच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.शिवसेनेच्या पुढची आवृत्ती भाजप लोकशाहीत कशाप्रकारे आंदोलन करायचे हा अधिकार सर्वांनाच आहे. तरीही, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आम्हाला शिवसेनास्टाईल सांगत मरिआई चौक ओलांडून दाखवा, असे आव्हान दिले. मात्र, बरडे यांनी हे विसरू नये की, शिवसेनेच्या पुढची आवृत्ती भाजप आहे. त्यांनाही आम्ही त्याच स्टाईलने पुढील काळातही आव्हान देऊ, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यावेळी म्हणाले.


जवळ्याला जाऊन देणार प्रत्युत्तर

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमच्या पक्षप्रमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अवहेलना केली, त्यामुळे मी त्यांना आव्हान दिले होते. पक्षाच्या बैठकीला कार्यकर्ते घेऊन येताना त्यांनी धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पाहार घातला. त्यावेळी त्यांना विरोध करणारी आमची संस्कृती नाही. सांगोल्याचा आमदार भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आला म्हणणाऱ्यांनी त्यांची ताकद का वाढली, त्यांचे आमदार, खासदार कोणामुळे विजयी झाले, याचेही आत्मचिंतन करावे. जवळ्यात जाऊन त्यांना निश्‍चितपणे प्रत्युत्तर दिले जाईल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.



Post a Comment

0 Comments