सावधान ! गुलाब चक्रवादळ आज पूर्व किनायाला धडकणार ; महाराष्ट्राकडे येण्याचे संकेत
गेल्या काही दिवसापासून थांबलेला पाऊस सध्या पडताना दिसला असून , यामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत आहे . अर्थात या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून या भागात कमी तीव्रतेचे वादळ तयार झाले आहे . गुलाब या नावाचे हे चक्रीवादळ शनिवारपासून घोंगावत असून , रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे .
हे वादळ महाराष्ट्राकडे सरकू शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे . या गुलाब चक्रीवादळामुळे ताशी 75 ते 95 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे . हे वादळ महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता वर्तवली जात असून , त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात व कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे .सरकण्याची शक्यता वर्तवली जात असून , त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात व कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे .हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची चिन्हे असून , ते किनाऱ्याला धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल आणि आंध्र , छत्तीसगड , तेलंगणा मार्गे महाराष्ट्रातील विदर्भाकडे ही सरकण्याची चिन्हे आहेत .
0 Comments