स्व.गणपतराव देशमुख यांचे विचार पुढे नेणार : राज्य चिटणीस भाई आ . जयंत पाटील
सांगोला / प्रतिनिधी स्व . भाई गणपतराव देशमुख यांचे विचार यापुढील काळात जोमाने पुढे घेऊन जात , पक्ष संघटना वाढविण्याचा संकल्प शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती राज्य चिटणीस भाई आ . जयंत पाटील यांनी दिली . शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दि . २५ व २६ सप्टेंबर अशी दोन दिवशीय बैठक सांगोला येथे आयोजित करण्यात आली .
यामध्ये पक्ष संघटनेशी निगडित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले . नवनवीन माणसे जोडणे ,तरुण वर्गाच्या हाती नेतृत्व देणे , ज्येष्ठ लोकांनी मार्गदर्शन करणे , चळवळीचे राजकारण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे या विषयावर चर्चा करण्यात आली . शेकाप हा वैशिष्टपूर्ण पक्ष असून समाजामध्ये , देशात शेतकऱ्यांचे संघटन , प्रबोधन करून शेतकरी , कामगार , कष्टकऱ्याचे सरकार दरबारी मांडावेत . वैचारिक वारसा , राष्ट्रीय विचार , तत्वज्ञानाचा अभ्यास कार्यकर्त्यांनी करावा . पक्षांशी तत्वज्ञान , एकनिष्ठता व बांधिलकी अटळ असली पाहिजे असे सांगून पक्षाच्या विचारधारेचा अभ्यास करा असे आ . पाटील यांनी सांगितले . प्रस्ताविक एस.टी. जाधव यांनी तर स्वागत ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख यांनी केले .
या बैठकीस डॉ.बाबासाहेब देशमुख , डॉ . अनिकेत देशमुख , चिटणीस विठ्ठलराव शिंदे , चंद्रकांत सरतापे यांच्यासह आजी - माजी जि.प. सदस्य , पं.स. सदस्य , नगरसेवक , सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन , व्हा.चेअरमन राज्यभरातील पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्व.देशमुख यांचे मुखवटे सदर बैठकीस उपस्थित असणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांचे मुखवटे तयार करून घातले होते . देशमुख यांचे कार्य महान आहे , यांचे रेकॉर्ड कोणीही मोडूशकणार नाही . त्यांचे विचारपुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे मुखवटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले .
0 Comments