मी शेकाप पक्षाचा आहे व शेकाप पक्षाचाच राहणार मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरुः शेकापचे नेते शंकर पाटील
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील महुद येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते शंकर पाटील आमदार शहाजीबापू पाटील यांना भेटून यापुढे शहाजीबापू पाटील गट म्हणजेच सेनेचे काम करणार आहेत अशी चर्चा फेसबूक , व्हाट्सअप वरती त्यांच्या फोटो बरोबर पसरवली आहे . सर्वत्र सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती
त्या दरम्यान त्यांना विचारले असता . आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती परंतु राजकीय संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती . मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मी शेतकरी कामगार पक्ष सोडलेला नाही . मी शेकापमध्ये राहून पूर्णपणे ताकतीने काम करणार आहे असे शेतकरी कामगार पक्षाचे महूद गटाचे नेते शंकर पाटील यांच्याकडून सांगण्यात आले .
0 Comments