सांगोला साखर कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घेतली आ.शहाजी पाटील यांची भेट
महुद / प्रतिनिधी सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू करून सांगोला तालुक्यातील ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल . हा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना , ऊस उत्पादकांना वेळेवर बिल , कामगारांना काम मिळाले पाहिजे . कारखाना चांगल्या पद्धतीने चालू रहावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू .१ नोव्हेंबरला कारखान्यातून साखर बाहेर काढणार असल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील सांगितले .
चिकमहुद ( ता.सांगोला ) येथील निवासस्थानी आ . शहाजीबापू पाटील यांची अभिजीत पाटील यांनी भेट घेतली . शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . असलेल्या अडचणी समजून घेतल्या व त्यांनी इतर साखर कारखान्याच्या दराप्रमाणे आपणही शेतकऱ्यांना दर देणार आहोत असेही अभिजित पाटील यांनी सांगितले . सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांनी , शेतकऱ्यांनी दुःख सोसलेले आहे . प्रत्येकाला आपला कारखाना बंद आहे याची मनामध्ये कुठेतरी सल होती अभिजीत पाटील यांनी ही सल कुंकर घालून काढून टाकली .
कारखान्याचे धुराडे चालणार , ऊस उत्पादकांना चांगला दर मिळेल असा विश्सास यावेट आ . पाटील यांनी व्यक्त केला . यावेळी पंचायत समिती सदर राजेंद्र मेटकरी , युवक नेते दिग्विज पाटील , माजी तंटामुक्त अध्यक्ष रव कदम , ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदः कालिदास भोसले , माजी उपसरपं बाळदादा भोसले , किशोर महारनव नवनाथ मगर , राजेंद्र भोसले यार शेतकरी उपस्थित होते .
0 Comments