सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार , राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर . !
गणेशोत्सवाला येत्या 10 तारखेपासून सुरवात होत आहे . सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असले , तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे . यंदाही साध्या पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे . लाडक्या बाप्पाला वाजत - गाजत आणण्यासाठी गणेशभक्त उत्सुक आहेत . मात्र , दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम असल्याने , राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे .
यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत . भाविकांना त्याचे पालन करावे लागणार आहे .नव्या नियमानुसार राज्यात सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे . भाविकांना प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावले आहेत . भाविकांना मुखदर्शनही घेता येणार नाही . यासह राज्य सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली जाणून घेऊ या .. गणेशोत्सवासाठी नवी नियमावली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल .
- मर्यादित स्वरुपात मंडप उभारण्यात यावेत . गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असून , घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी . श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट , तर घरगुती गणपतीकरिता 2 फुटांची मर्यादा आहे . शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू , संगमरवर मूर्तीचे पूजन करावे , शाडूची पर्यावरणपूरक मुर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे . विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास , नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे .- - -उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा . जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही , असे पाहावे . आरोग्यविषयक , सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात . - सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / रक्तदानासारखी शिबिरे घ्यावीत . कोरोना , मलेरिया , डेंग्यू आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय , तसेच जनजागृती करावी .- - वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करावे , पूर्वीचे निर्बंध कायम राहतील . त्यात कुठलीही शिथिलता देता येणार नाही
आरती , भजन , कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही , याबाबत दक्षता घ्यावी . ध्वनीप्रदुषणांसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे .श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत . विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करावी . विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे . लहान मुले , ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे . संपूर्ण चाळीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जन मिरवणूक एकत्रित काढू नयेत .
0 Comments