सोलापूर ग्रामीणचे नुतन अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्वीकारला पदभार
सांगोला ( प्रतिनिधी ) – सोलापूर ग्रामीणचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी आज आपला पदभार स्वीकारला असून त्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची रायगड जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची बदली करण्यात आली होती . त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला .


0 Comments