google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरातील सुमारे 17 लाख रूपयांच्या कचरा विघटनाच्या कामाचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Breaking News

शहरातील सुमारे 17 लाख रूपयांच्या कचरा विघटनाच्या कामाचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 शहरातील सुमारे 17 लाख रूपयांच्या कचरा विघटनाच्या कामाचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरातील कडलास रोड येथील नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये गेली 30 वर्षांपासून कचरा साठून राहिलेला होता. येथील कचरा विघटन करण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत सुमारे 17 लाख 68 हजार 914 रू. निविदा प्रक्रिया करून त्याबाबतचे प्रत्यक्षरित्या काम सुरू झाले आहे. या कामाचे उद्घाटन शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्याहस्ते करण्यात आले.


या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये एकूण 13975 घनमीटर कचर्‍यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 4200 घनमीटर इतक्या कचर्‍यावरती विघटनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामधून विघटन झालेल्या कचर्‍यावरती प्रक्रिया करून याद्वारे कंपोस्ट खत तयार केला जातो आणि तो शेतकरी व व्यापारी यांना विकला जातो. तसेच यामधील काच, प्लॅस्टिक यांना वेगळे करून वस्तूंच्या पुनर्वापराच्या उपयोगासाठी विकले जाते. यामध्ये उर्वरित जुन्या कचर्‍याच्या विघटनासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजूर्‍या घेऊन त्यावरही लवकरच प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.



यावेळी बांधकाम समितीच्या सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, आरोग्य समितीचे सभापती रफिक तांबोळी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, नगरसेवक सचिन लोखंडे, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक शिवाजी सांगळे, आनंद घोंगडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments