14 व्या वित्त आयोग कार्यात्मक अनुदानातील नगराध्यक्षा यांच्या 15% निधीतून सनगर गल्लीमधील समाजमंदिराच्या कामास प्रशासकीय मान्यता
सुमारे 1 कोटी 24 लाख रूपयांच्या कामांस प्रशासकीय मंजूरी
सांगोला/प्रतिनिधी ः14 व्या वित्त आयोग कार्यात्मक अनुदानअंतर्गत नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून सांगोला शहरामधील सनगर गल्ली येथे समाज विकास केंद्र बांधणे, पुजारवाडी येथे महिला व पुरूषांसाठी समाज विकास केेंद्र विकसित करणे या कामांसाठी सुमारे 1 कोटी 24 लाख रूपयांच्या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. तसेच 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 2021-22 वर्षातील पिण्याचे पाणी व घनकचरा व्यवस्थापनसाठी सुमारे 67 लाख रूपयांचे अनुदानही प्राप्त झाले असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली आहे.
यामध्ये 14 व्या वित्त आयोग कार्यात्मक अनुदानअंतर्गत नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून सांगोला शहरामधील सनगर गल्ली येथे समाज विकास केंद्र बांधणे- कामाची रक्कम 74 लाख 47 हजार 981 रू, तसेच पुजारवाडी येथे महिला व पुरूषांसाठी समाज विकास केंद्र विकसित करणे- कामाची रक्कम 49 लाख 71 हजार 67 रू. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच सदरच्या कामांची निविदा प्रक्रिया करून ही कामे सुध्दा लवकरच मार्गी लावली जातील, असे आश्वासनही नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिले. तसेच 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 2021-22 वर्षातील पिण्याचे पाणी व घनकचरा व्यवस्थापनसाठीचे सुमारे 67 लाख 31 हजार रूपयांचे अनुदानही प्राप्त झाले आहे.
सदरच्या कामांसाठी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असून सनगर गल्ली येथील समाज विकास केंद्रामुळे शहराच्या वैभवात चांगलीच भर पडणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments