google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देशात डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार ! लसीकरणानंतरही होतेय कोरोनाची लागण ; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Breaking News

देशात डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार ! लसीकरणानंतरही होतेय कोरोनाची लागण ; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

 देशात डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार ! लसीकरणानंतरही होतेय कोरोनाची लागण ; लोकांमध्ये भीतीचे वातावरण


जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे . रुग्णांची संख्या तब्बल 21 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . अनेक देशांत कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे .प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत . कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे .


 देशातही डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे .देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहाचला आहे . गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,457 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे .कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे 


 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून लसीकरणानंतरही कोरोनाची लागण झाली आहे .वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . इन्साकॉगने बुलेटिन जारी करून डेल्टा व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली आहे . आतापर्यंत 72 हजारांहून अधिक सँपल्सचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं आहे .


20 हजारांहून अधिक सँपल्समध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे . रिपोर्टनुसार , देशात 72931 सँपलचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं . त्यातील 30230 जणांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट आढळून आले आहेत .इन्साकॉगनुसार , आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाले आहेत . ज्यातील पाच भारतातही आहेत . अमेरिका , ब्रिटन , चीनसह 100 हून अधिक देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आले आहेत .रिपोर्टनुसार , 6.7 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यातील 1.20 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून देखील ते संक्रमित झाले आहेत . एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे .जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे . कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे . अशातच लस आणि साईड इफेक्टची चर्चा रंगली आहे .


 अनेकांनी साईड इफेक्टच्या भीतीने लस घेण्यास नकार दिला आहे .कोरोना व्हायरस आणि लस याबाबत युद्धपातळीवर संशोधन केलं जात असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे . अशाच एका रिसर्चमधून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे . कोरोना लसीमुळे पॅरालिसिसचा धोका अत्यंत कमी असल्याची माहिती आहे .कोरोना लसीचे अनेक फायदे असल्याचंही रिसर्चमध्ये म्हटलं आहे . हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी इनएक्टिवेटेड लस जर एक लाख लोकांना दिली तर 4.8 टक्के लोकांना या चेहऱ्याच्या पॅरालिसिसचा धोका असल्याचं म्हटलं आहे .लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये संशोधकांनी याला बेल्स पाल्सी असं म्हटलं आहे . ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजुला लकवा मारला जातो .


 पण या आजाराची लक्षणं सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात .संशोधक प्रा . लॅन चि की वोंग यांनी कोरोनोवॅक लस घेतल्यानंतर अशा प्रकारची अधिक प्रकरणे पाहिली जात आहेत असं म्हटलं आहे . तसेच अमेरिकेत वापरली जाणारी फायझर आणि मॉडर्ना ही एमआरएनए लस आहे . त्यात अशी कोणतीही चिन्हे नाहीत पण देखरेख चालू आहे .


आयर्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार , कोविड सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये बऱ्याच काळापासून रक्त गोठण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे . यामुळे , श्वास घेण्यात अडचण , शारीरिक तंदुरुस्ती आणि थकवा यासारखी लक्षणे कोरोनापासून बरे झाल्यानंतरही बराच काळ राहतात .

Post a Comment

0 Comments