google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाज अन्याय प्रकरणी विवीध संघटनांचा अकलूज येथे मोर्चा

Breaking News

माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाज अन्याय प्रकरणी विवीध संघटनांचा अकलूज येथे मोर्चा

 माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाज अन्याय प्रकरणी विवीध संघटनांचा अकलूज येथे मोर्चा



श्रीकांत कसबे माळेवाडी बोरगाव ता.माळशिरस येथील मातंग समाजतील सरपंच दशरथ साठे यांचे अंध बंधू अंनत साठे यांची मयत स्मशानभुमीत नेण्यासाठी तेथील जातीयवादी लोकांनी अडवणुक केली.प्रशासनाने मदत केली नाही.म्हणून सदर मयत सामाजिक संघटना व मयताचे नातेवाईक यांनी ग्रामपंचायत समोर प्रेत जाळले.या प्रकरणातील आरोपीवर त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी अकलुज प्रांत कार्यालयावर विवीध संघटनांचा मोर्चा काढण्यात आला.

डाँ .बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकातून प्रांत कार्यालय येथे मोर्चा आलेनंतर मोर्चा समोर विवीध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सोमनाथ भोसले(पिपल्स रिपब्लिकन पार्टी) राजकुमार व किरण(वंचित बहुजन आघाडी)दादासाहेब लोखंडे(भारतीय दलित महासंघ)साधू बल्लाळ बारामती,प्रा.धनंजय साठे(जिल्हाध्यक्ष राष्टवादी सामाजिक न्याय विभाग)धनाजी पवार (रिपाई ए)सदामते,(राष्ट्र विकास सेना, सांगली)शेखर खिलारे(युवासेना)अनिल भिंगारदिवे, (प्रदेशाध्यक्ष लक्षवेधी सेना)

नंदाताई लोखंडे,(प्रदेशाध्यक्ष, लहूजी क्रांती सेना, अहमदनगर)कृष्णा वाघमारे(माजी नगरसेवक, पंढरपुर)अँड.किर्तिपाल सर्वगोड( राज्य उपाध्यक्ष रिपाई, युवक आघाडी)नगरसेवक वाघमारे(कवठे महंकाळ)नरेंद्र भोसले(तालुकाध्यक्ष रिपाई ए,माळशिरस)प्रा.लोखंडे, बाळासाहेब धाईंजे(जी.प.सदस्य माळशिरस)महादेव तुपसौंदर(लहूजी शक्ति सेना) रामभाऊ वाघमारे(मातंग एकता आंदोलन)काकासाहेब जाधव(रामोशी समाज प्रतिनिधि, बहूजन मुक्ति पार्टी)अनिकेत मोहिते पुणे,अनिल साठे,(लक्षवेधी सेना)सागर लोखंडे,(लहूजी शक्ती सेना)किरण साठे अनिल हातागळे, अँड.किशोर खिलारे, भाई जाधव मुंबई, द्न्यानदेव खंडागळे,(मातंग आघाडी रिपाई ए)जेष्ठ कार्यकर्ते विकास धाईंजे, हनुमंत साठे(प्रदेशाध्यक्ष, मातंग आघाडी,रिपाई ए)राजाभाऊ खिलारे(राज्य उपाध्यक्ष, दलित महासंघ) नंदकुमार केंगार ( प्रदेशाध्यक्ष,होलार समाज सघटना व राज्य उपाध्यक्ष रिपाई ए) विष्णु कसबे (प्रदेशाध्यक्ष लहूजी शक्ती सेना) माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्र संचालन वैभव गिते यांनी केली.

पिडीत कुटूंबाचे वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी,संबधित आरोपीला पाठीशी घालणार्या पोलीसावर कारवाई व्हावी,पिडितांना कायमचे संरक्षण द्यावे,अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमीचा रस्ता त्वरीत करुन द्यावा यासह अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments