google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जाऊ द्या , मरु द्या . मुख्यमंत्र्यांचा अपमान ; राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलगीरी व्यक्त केली

Breaking News

जाऊ द्या , मरु द्या . मुख्यमंत्र्यांचा अपमान ; राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलगीरी व्यक्त केली

 जाऊ द्या , मरु द्या . मुख्यमंत्र्यांचा अपमान ; राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलगीरी व्यक्त केली


 तरी शिवसैनिक आक्रमक या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री भरणे ( मामा ) म्हणाले की , मुख्यमंत्री आमचे नेते आहेत . त्यांच्यावर माझे प्रेम आहे . माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला . आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे .

 सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे वादात सापडले आहेत . दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे . दत्तामामा यांनी सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ओघाने ' मुख्यमंत्र्यांचं जाऊ दा , मरु द्या ' असं वक्तव्य केलं होतं .त्यावरुन नवीन पनवेल शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे कोण हे दत्तात्रय भरणे तुमचं डोकं ठिकाणावर आहे

 का नसेल तर शिवसैनिक ठिकाणावर आणतील यापुढे अशी बेताल वक्तव्य खपून घेतली जाणार नाही तोंडावरती स्वतःच्या आवर घाला अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ असा सज्जड इशारा प्रशांत जाधव यांनी दिला आहे . वक्तव्याचा चुकीचा अर्थ या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री भरणे ( मामा ) म्हणाले की , मुख्यमंत्री आमचे नेते आहेत . त्यांच्यावर माझे प्रेम आहे . माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला . आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे 

 मुख्यमंत्र्यांना जाऊ द्या , मरु द्यागटनेत्यांनी , नगसेवकांनी , आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे . इथे चांगले गार्डन आपल्याला करायचे आहे . त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे . तुमचा प्रस्ताव कधी येईल मला ? असे बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले असता ते मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या , मरु द्या , आपले आपण करु . मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ . आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु . असे वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले होते . त्यानंतर हे नवे वादंग झाले होते .

Post a Comment

0 Comments