' ओ शेठ ... तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट ! ' लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई
सांगोला : दुपारची वेळ ... कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर सांगोला पोलिसांची करडी नजर होती . पोलिस कारवाई करत असले तरीही अनेक जण रस्त्यावरून फिरताना दिसत होते .
एक मोटारसायकलस्वार डबल सीट पोलिसांच्या समोरच मास्क न लावता ( त्यातील एकाने ) बंदी असतानाही तसाच चाललेला दिसला . त्या वेळी पोलिसांनी लगेचच त्याला थांबण्याचा इशारा केला व तो जवळ येताच म्हणाले , ' ओ शेठ ... तुम्ही एवक्यातूनही जाताय थेट ! ' . त्याच वेळी पोलिसांपासून थोडं दूर असलेला पाठीमागे बसलेला लगेच म्हणतो , ' आमचा नादच असतो थेट ! ' यांच्या बोलण्यातून पोलिसांच्या कारवाईपेक्षा ' ओ शेठ ' या गाण्याचाच प्रभाव दिसून आला .
सांगोला तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्यारुग्णसंख्येमुळे सध्या लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे . तालुक्यात १० हजार ४ ९ १ कोरोना रुग्ण बरे झाले असून एक हजार १७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत . तर आतापर्यंत शासकीय आकडेवारीनुसार १४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमध्ये सांगोल्याचा समाविष्ट असल्याने येथे निबंध घालण्यात आले आहेत . निबंध असले तरी अनेकजण रस्त्यावरून अजूनही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत . प्रशासनातील महसूल , पोलिस व नगर विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत मोकाट फिरणान्यांविरोधात तसेच नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे . प्रशासनाद्वारे कारवाई होत असली तरी अनेक जण या कारवाईला जुमानत नाहीत . पोलिसांसमोरच नियम मोडून जाताना दिसतात
.' ओ शेठ'चा बोलण्यातूनही प्रभाव ' ओ शेठ , तुम्ही नादच केलाय थेट , ओ शेठ , तुम्ही माणूस हाय लई ग्रेट ! ' सध्या हे गाणे प्रसिद्धीच्या शिखरावर असून अनेकांच्या ओठांवर गुणगुणताना दिसते .
याची प्रचिती कारवाई करतानाही पोलिसांकडून किंवा पाठीमागे बसलेल्या त्या व्यक्तीच्या बोलण्यातून दिसून आले . गाण्याच्या आधार घेत पोलिस सांगत होते की , ' ओ शेठ तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट ! ' परंतु पाठीमागे बसलेला परंतु मास्क लावलेला त्यांच्या बोलण्याच्या आधारावरच ' ओ शेठ , आमचा नादच असतो थेट ' असे सहज बोलून गेला . विनाकारण , विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करणान्या पोलिसांपेक्षा अन् कारवाईपेक्षा गाण्यातून झालेल्या संवादामुळे लोकांचा टाईमपास मात्र नक्की झाला .
0 Comments