भयानक प्रकार….! महिला सहाय्यक उपायुक्तांची बोटं छाटली; परप्रांतीय फेरीवाल्याची कारवाईवेळची भयंकर घटना .
ठाणे: काल झालेल्या भयंकर घटनेमध्ये ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माजीवडा मानपाडा विभागाच्या सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करुन त्यांची बोटं छाटली आहेत.या हल्ल्यात पिंपळे जखमी झाल्याअसून त्यांच्यावर घोडबंदर परिसरातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकालाही या हल्ल्यात इजा झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर अवैध फेरीवाल्यांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
परप्रांतीय अमरजीत यादव असं या हल्लेखोर फेरीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून त्याच्या जवळचा चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील मनात धडकी भरली होती, तर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दुरूनच फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.आरोपी अमरजीत यादव हा मुळचा बिहारचा असून तो ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहतो. याआधीही ३ वर्ष अगोदर अमरजीतने अशा प्रकारे हल्ला केला होता. आरोपी कासारवडवली पोलिसांच्या अटकेत असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याचं कळतंय.
0 Comments