संतापजनक! घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मंगळवेढयातील एकावर गुन्हा दाखल
घरात घुसून एकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केला. काल रविवारी दि.२९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात ही घटना घडली.याप्रकरणी अरबाज समीर मुल्ला (रा.मंगळवेढा ) याच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातवीत शिकणारी मुलगी (वय १४) शेजारच्या जिल्ह्यातील आहे. उपजीविकेसाठी तिची आई येथे राहण्यास आली आहे.
रविवारी दुपारी ती घरात एकटीच होती. तेव्हा अरबाज याने घरात घुसून आतून दरवाजाला कडी लावली. तसेच तिचा विनयभंग केला याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली.त्यावरुन त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४ अ , बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८,१२ , अनूसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील तपास करीत आहेत.
0 Comments