google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नगरपालिका निवडणूकीत आरपीआय आठवले गट या पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

Breaking News

नगरपालिका निवडणूकीत आरपीआय आठवले गट या पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

 नगरपालिका निवडणूकीत आरपीआय आठवले गट या पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार : नगरसेवक सुरज दादा बनसोडे


सांगोला/प्रतिनिधी :नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका थोड्याच दिवसात होणार आहेत. त्या अनुषंगाने सांगोला शहरांमधील राजकीय पक्ष हे एकमेकांबरोबर युत्या व आघाड्या करण्याच्या हालचाली होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील येणाऱ्या तालुक्यामध्ये या निवडणूक संदर्भात आर.पी.आय. ची भूमिका काय असेल यासंदर्भात सोलापूर येथे शासकीय विश्रामगृहात 27 ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक आर.पी.आय.चे महाराष्ट्र संघटक सचिव सुनील सर्वगोड, जिल्हाध्यक्ष व मोहोळ पंचायत समिती उपसभापती अशोक नाना सरवदे, आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक अजित भाऊ गायकवाड, जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरुण आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 


सदर बैठकीमध्ये येणाऱ्या या निवडणुकांसाठी साधक-बाधक चर्चा झाली. आर.पी.आय. आठवले गटाची भाजपबरोबर युती असून, त्यांनी आर.पी.आयला योग्य त्या जागा शहराच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दिल्यास त्यांच्या बरोबर युती हि कायम राहील. त्यांनी आर.पी.आय.ला जागा न सोडल्यास आठवले साहेबांशी चर्चा करून आर.पी.आय. पक्ष बांधणी साठी वेगळा विचार करेल. सांगोला शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर जे पक्ष गेल्या नगरपालिकेला एकमेकांच्या विरोधात होते. पुन्हा विधानसभेला काही पक्ष विरोधात गेले तर सर्व विरोधातले पक्ष एकत्र आले आणि या येणाऱ्या निवडणुकीसाठी ज्या पक्षाने व गटाने गेल्या नगरपालिकेला व विधानसभेला विरोधात काम केले तेच स्वतःच्या अस्तित्वासाठी व सत्तेच्या हव्यासापोटी युत्या व आघाड्या करत आहेत. आर. पी. आय. पक्षाने गेली नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला गेली पंधरा वर्षे सहकार्य केले आहे. विधानसभेला सर्वच पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्या विरोधात असताना आर.पी.आय. ने सर्वतोपरी त्यांना मदत केली आहे. म्हणून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षांची युती झाली तर आर.पी.आयची भाजप पक्षाबरोबर युती आहे. 


शिवाय शेतकरी कामगार पक्षाला जवळजवळ पंधरा वर्षे आर.पी.आयने सहकार्य केले आहे. तसेच पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ या निवडणुकीत आरपीआयने भाजपला सहकार्य केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून आर.पी.आय आठवले गटाला योग्य त्या सन्मानपूर्वक जागा नाही सोडल्यास आठवले साहेबांशी चर्चा करून आर.पी.आय पक्षाच्या अस्तित्वासाठी वेगळा विचार करणार.

सदर बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी या मिटींगचे आभार आर.पी.आयचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण आण्णा बनसोडे यांनी केले.



Post a Comment

0 Comments