प्रतिनिधी अकलूज मौजे वेळापूर या रस्त्यावरून मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे वय 20 राहणार वेळापूर हा आई छाया पांडुरंग दांडगे वय 45 राहणार वेळापूर आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग घाडगे 18 तिच्यासोबत दुचाकी क्रमांक एम एच 01 ए एस 2370 वरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात असताना
माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर के ए 01 एच 5951 ने जोरदार धडक दिली यामध्ये छाया दंडागे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत विनोद राजकुमार पवार राहणार वेळापूर यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून कंटेनर चालक शिवशंकर हाजी बसप्पा राहणार नामकल तामिळनाडू याला ताब्यात घेण्यात आले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहेत
0 Comments