वर्षभरात सोलापुरातील १४ ९ ६ गुन्ह्यांपैकी ६०८ उघडकीस ; ९ ० सावकारांवरही कारवाई !
सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी २०२०-२०२१ या सालात एक हजार ४ ९ २ गंभीर गुन्हे झाले असून , ६०८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत . सावकाराविरुद्ध घेण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ९ ० गुन्हे दाखल झाले असून , यामध्ये ९ ७ सावकारांवर कारवाई केली आहे . मध्ये एकूण आठ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे , अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर , दीपाली धाटे आदी उपस्थित होते . दरम्यान , त्यांनी यंदाचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे सांगितले . पोलीस आयुक्तालयाच्या २ ९व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले की , कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायंकाळी ४ नंतर लॉकडाऊन करण्यात आले आहे .दरवर्षी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी , सामाजिक संघटनांच्या मदतीने उपक्रम राबविले जातात . मात्र २०२० मध्ये कोरोनामुळे वर्धापन साध्या पद्धतीने साजरा केला होता . यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने १० ऑगस्ट रोजी होणारा वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे , असे म्हणाले . जागा प्लॅट फसवणूक प्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले असून , यामध्ये ११६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे . जुगारा संदर्भात ३७२ गुन्हे दाखल झाले असून , एक हजार ६७६ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे . तीन वर्षांत २२ लोकांवर एमपीडीएची कारवाई • ० शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या तीन वर्षांत २८ गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी तडीपारचे ९ ४ प्रस्ताव तयार करण्यात आले .होते . त्यात १८२ गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई झाली आहे . • ० शहर वाहतूक शाखेच्या वतीने २०१ ९ ते २०२१ दरम्यान तीन लाख ३५ हजार ८८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे . वाहनचालकांकडून ११ कोटी सहा लाख ६८ हजार ६५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे . • ० कोरोना संसर्ग कालावधीत नियमांचा भंग करणाऱ्या ५०३० गुन्हे दाखल करण्यात आले असून , ११ हजार ४३ ९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे . • ० आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ठेवीदारांच्या २५ कोटी ४५ लाख ५८ हजार ३१ ९ रुपये किमतीच्या मालमत्ता संरक्षित करण्यात आल्या आहेत
0 Comments