धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. मिनाक्षी येडगे यांची निवड
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. मिनाक्षी बंडोपंत येडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी सौ. दिपाली भागवत सरगर, सचिव पदी सौ. मिनाक्षी शिवाजी गडदे, खजिनदार पदी सौ. कल्पना किसन माने, सल्लागार पदी ऍड. संजीवनी खांडेकर-लवटे यांची निवड करण्यात आली.
महिलांनी फक्त चूल आणि मूल यांमध्ये गुंतून न राहता समाजामध्ये मिसळून विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यासाठीच ही संस्था काम करत
असल्याचे यावेळी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी सांगितले.सदर कार्यक्रमासाठी सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, शांताताई हाके, राजमाता महिला पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. प्रियांका श्रीराम, संस्कृती लवटे, अनिता जानकर, शिला माने, सौ. नकुशा जानकर, रेश्मा गावडे, कौशल्या गावडे, सुनीता आलदर, प्रियंका रुपनर आदी महिला उपस्थित होत्या.
0 Comments