सांगोले शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते कि , कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत मा.जिल्हाधिकारीसो सोलापूर यांनी कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने कोरोना संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने दिनांक 13.08.2021 चे सकाळी 7.00 वा.पासून पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत
.अत्यावश्यक सेवा / वस्तूशी संबंधित असणारी दुकाने / आस्थापना ( सर्व किराणा दुकाने , भाजीपाला दुकाने , फळांची दुकाने , डेअरी , बेकरी , मिठाई आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने , सर्व वैद्यकीय आणि आरोग्य सेवा , पशुवैद्यकीय सेवा , कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा , बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती इ . ) आठवड्याच्या सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील . बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूशी संबंधित असणारी दुकाने / आस्थापना आठवड्याच्या सर्व दिवशी पुर्णपणे बंद राहतील . हॉटेल / रेस्टॉरंट ची केवळ पार्सल सेवा / घरपोच सेवा चालू राहतील . कृषी उपक्रम आठवड्याच्या सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील . सार्वजनिक ठिकाणे / उघडी मैदाने / चालणे / सायकलींग हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 5.00 ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत सुरु राहतील . शनिवारी व रविवारी पुर्णत : बंद राहतील . खेळ फक्त ऑटडोअर साठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 5.00 ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत चालू राहतील . शनिवारी व रविवारी पुर्णत : बंद राहतील . मॉल / थिएटर / मल्टिप्लेक्स / नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील . सामाजिक , सांस्कृतिक , मनोरंजन मेळावे पुर्णपणे बंद राहतील . जीम सलून / ब्युटी पार्लर , केंद्रास्पा / वेलनेस सेंटर पुर्णपणे बंद राहीतील . . विवाह सोहळ्यासाठी दोन तासापेक्षा जास्त नसेल एवढ्या कालावधीत एकुण 25 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील . .अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींची परवानगी राहील . 2.अत्यावश्यक / वैद्यकीय कारणासाठी होणारी हालचाल / प्रवास वगळता संचारबंदी लागू राहील .सर्व उद्योग , व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा - यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील . वरील नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत संबंधित दुकान बंद ठेवण्यात येईल तसेच पुर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल याची व्यापारी व नागरिकांनी नोंद घ्यावी .
0 Comments