google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात आधी शपथ नारायण राणेंची , कोणाला मंत्रिपद तर कोणाला डच्चू , संपूर्ण यादी -

Breaking News

सर्वात आधी शपथ नारायण राणेंची , कोणाला मंत्रिपद तर कोणाला डच्चू , संपूर्ण यादी -

 सर्वात आधी शपथ नारायण राणेंची , कोणाला मंत्रिपद तर कोणाला डच्चू , संपूर्ण यादी -


‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सभागृहात प्रवेश झाल्यावर शपथविधीला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे राणेंना केंद्रात मोठं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे 2019 मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे . सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालं आहे . या विस्ताराआधी सरकारमधील 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले. महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील दिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि राज्यसभा खासदार भागवत कराड यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना , ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी राणे साहेबांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या ज्या वेळी त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकण्यात आली त्यावेळी त्यांनी ती पूर्ण करण्याचं काम केलंय. आज त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. राणे साहेब हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही अचानक पोहोचले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पूर्वकल्पना दिली नव्हती. आजही अनेकजण राणे साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतात. साहेबांनी प्रत्येक पदाला खूप गांभीर्याने घेतलं आहे. आज त्यांना जी जबाबदारी दिली गेली ते ती चोखपणे बजावतील यात शंका नाही ‘ असे म्हटले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यात महाराष्ट्रातील 4 खासदारांना केंद्रीय मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. त्यात खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या चौघांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देण्यामागे आगामी महापालिका निवडणुकाांसह जातीय समिकरणाचाही विचार करण्यात आल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments