सांगोला तलाठी संघटनेने स्थगित केलेले आंदोलन दिनांक 07/07/2021 पासून बेमुदत रजा आंदोलन सलग करीत आहोत .
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविण्यात येते की सांगोला तालुका तलाठी संघाने तलाठी संवर्गातील मंडळ मंडळ अधिकारी , अव्वल कारकून व नायब तहसीलदार यांच्या विविध प्रकारच्या 37 मागण्यांसाठी दिनांक 19/01/2021 पासून बेमुदत रजा आंदोलन पुकारलेले होते त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये सोलापूर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांचे समवेत मा . जिल्हाधिकारी महोदय यांचे दालनात दिनांक 21/01/2021 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत बैठक घेण्यात आली सदर बैठकीत निवेदनात दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन तलाठी यांच्या सर्व मागण्या मार्च अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन संप माघार घेणे बाबत सूचना दिले . त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा तलाठी संघाने व तदनुषंगाने सांगोला तलाठी संघटनेने दिनांक 22/02/2021 पासून संप तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला व कामकाज सुरळीत पणे चालू केले तसेच जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांचे दिनांक 29/02/2021 रोजीचे नियोजन भवन येथील आढावा बैठकीसाठी सोलापूर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांना बोलविण्यात आले होते त्यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडीअडचणी तात्काळ सोडविणे बाबत मा . जिल्हाधिकारी महोदय व मा . अप्पर जिल्हाधिकारी साहेब तसेच मा . निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या व अशा प्रकारचे आदेशही मा . जिल्हाधिकारी महोदय यांचे मार्फत निर्गमित करण्यात आले आहेत . तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये सोलापूर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये मा . जिल्हाधिकारी महोदय यांनी निवेदनातील मागण्यांचे कामकाजाबाबत लेखी कळवून दिनांक 18/06/2021 पासून चे बेमुदत आंदोलनाचा मार्ग टाळून प्रशासनास सहकार्य करावे असे लेखी पत्र दिलेले आहे . सदर पत्राचा आदर करून सोलापूर जिल्हा तलाठी संघाने व तदनुषंगाने सांगोला तलाठी संघटनेने तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला . परंतु प्रशासनाकडून वेळोवेळी बैठका घेऊनही व संघाचे पदाधिकारी यांनी मागण्याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील अद्याप पर्यंत निवेदनातील मुद्द्यांबाबत प्रशासन गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसून येत नाही तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडचणी सोडविणे बाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे म्हणून सोलापूर जिल्हा तलाठी संघाने व तदनुषंगाने सांगोला तलाठी संघटनेने स्थगित केलेले आंदोलन दिनांक 07/07/2021 पासून बेमुदत रजा आंदोलन सलग करीत आहोत . आंदोलन काळात होणाऱ्या परिणामास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी .
0 Comments