संजय नगर झोपडपट्टी सांगोला येथील श्रीशंकर खटकाळे यांच्या टोळीवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करावी.... आरपीआय सांगोला तालुका अध्यक्ष श्री खंडू तात्या सातपुते
दि . ०३/०७/२०२१ रोजी रात्री ८.३० वाजता हलदहिवडी येथील राजू सुरेश पवार या बौध्द कुटूंबावर शंकर खटकाळे व त्याच्या साथीदारांनी हल्ला करुन त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या कुटूंबातील महिला व मुलींना देखील मारहाण केली आहे . याबाबत सांगोला पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे . सदर व्यक्ती ही संजय नगर झोपडपट्टी सांगोला येथील रहिवाशी आहे . तसेच ते फाईट क्लब व याराणा ग्रुपचे सदस्य आहे . या पुर्वी त्यांनी दोन वेळा गांवामध्ये गाडयावर येवून हातात हत्यारे घेवून समाजामध्ये दहशत पसरवली आहे . तसेच वरील इसम हा गुड प्रवृत्तीचा असुन त्यांचा गावातील लोकांना नाहक त्रास होऊ लागला आहे . सदर टोळीला गावातील व तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्तीने सांगुन ही त्यांचे हे कृत्य थांबत नाही त्यांच्या टोळीकडे बेकायदेशिर शस्त्रे आहेत . तसेच बिगर नंबरच्या गाड्या आहेत . या गाडयावर येवून ते गांवामध्ये विना कारण दहशत पसरवत आहेत . तसेच हलदहिवडी येथील भिमनगर माझे रोवून अशा प्रकारे कृत्य करुन दलित समाजावर अन्याय करीत आहे . तरी संजयनगर झोपडपट्टी सांगोला येथील शंकर खटकाळे यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करणेबाबत अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ रोजी सांगोला तहसिल कार्यालयासमोर समाज बांधव व कार्यकर्त्यासह ११ ते ५ या वेळेत उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी



0 Comments