google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

Breaking News

महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

 महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?


राज्यात राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे.अशातच आता शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आगमी पावसाळी अधिवेशनासंबंधित हा व्हिप आहे.पाच आणि सहा जुलै रोजी राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे.त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना या अधिवेशनास उपस्थित राहायचे आहे, असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी जारी केला आहे. सध्या राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं रद्द केलेलं आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना रूग्णांची वाढती संख्या यांसारख्या अनेक मुद्यांमुळे हे पावसाळी अधिवेशन महत्वाचं ठरणार आहे.यामुळे दक्षता म्हणून शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हिपचा साधासोपा अर्थ म्हणजे पक्षशिस्तीचं पालन करणे होय. व्हीपची संकल्पना ब्रिटिश काळातील आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप असतो.आपल्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम या व्हीपने करायचे असते या साऱ्या घटनांवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज सायंकाळी विधीमंडळ अधिवेशनासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. ही निवडणूक घ्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. हे पद रिक्त असल्याने घटनात्मकदृष्ट्या सरकार काम करत नसल्याची तक्रार भाजपने राज्यपालांकडे केली आहे.याच निवडणुकीत घातपात होऊ शकतो, असा महाविकास आघाडीला संशय आहे. भाजपचे नेते या वर स्पष्टपणे बोलत नसले तरी संधी मिळाल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडीत संकटात टाकू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.हे पद काॅंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध होऊ शकतो. अजून तीनही पक्षांच्या समन्वय समितीत संभाव्य नावाची चर्चा व्हायची आहे.

Post a Comment

0 Comments