google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ. प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून शहरामध्ये 13 हायमास्ट दिव्यांना मंजूरी

Breaking News

आ. प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून शहरामध्ये 13 हायमास्ट दिव्यांना मंजूरी

 आ. प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून शहरामध्ये 13 हायमास्ट दिव्यांना मंजूरी


सांगोला/प्रतिनिधी ःसागोला शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सांगोला शहरामध्ये विविध 13 ठिकाणी हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई आनंदा माने यांनी दिली.यामध्ये शहरातील प्रभाग क्र. 1 मधील आ.क्र. 46 बगीचामध्ये तसेच प्रभाग क्र. 3 मधील सांगोला शहर आठवडा बाजार याठिकाणी 2 हायमास्ट दिवे तसेच प्रभाग क्र. 4 मधील तेली गल्ली इंगोले घराजवळ, वज्राबाद पेठ मारूती मंदिराजवळ, धनगर गल्ली सार्वजनिक शौचालयाजवळ, धनगर गल्ली गणेश निंबाळकर घरासमोर, इंदिरानगर झोपडपट्टी तसेच प्रभाग क्र. 5 मधील संजयनगर झोपडपट्टी तसेच प्रभाग क्र. 6 मधील सावंत वस्ती शिवाजी चौक चांडोलेवाडी, चांडोलेवाडी चौक तसेच प्रभाग क्र. 7 मधील स्टेशन रोड जुन्या स्टेट बँकेसमोर तसेच प्रभाग क्र. 9 मधील महादेव मंदिर महादेव गल्ली याठिकाणी हे एकूण 13 हायमास्ट दिवे आ. प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून मंजूरी मिळाली असून लवकरच कामास सुरूवात करून बसविण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments