सांगोला तालुक्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचायांनी प्रत्येकीदहा टोपांचे वृक्षारोपण करणे बंधनकारक : तहसीलदार अभिजीत पाटील
महाराष्ट्र शासन वन विभाग यांचेकडील महत्वपुर्ण उपक्रम वृक्षारोपन करणे व त्याची अम्मल बजावणी करणे असा आहे . त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर यांनी दिनांक 11/06/2021 रोजी व्ही.सी.व्दारे सुचना निर्गमित केलेले असून तालुक्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येकी 10 वृक्ष लावणे आवश्यक आहे या बाबत फोटोसह अहवाल सादर करणेचेही सुचना निर्देशित केलेल्या आहेत . सांगोला तालुका आवर्षण प्रवण क्षेत्र असून सतत दुष्काळ सदृष्यस्थिती निर्माण होत असते . त्यामुळे सांगोला तालुक्यात वृक्ष लागवड करणे अतिशय महत्वाची बाब आहे . निसर्गाचा समतोल राहणेसाटी वृक्ष महत्वाचे आहेत . वृक्षापासून शुध्द हवा , पर्जन्यमान व नैसर्गिक जैवविविधता यांचा समतोल राहणेस मदत होते . वृक्षारोपन करुन त्यांचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य व सामाजिक जबाबदारी आहे . आपले कार्यक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने 10 वृक्ष लावणे आवश्यक आहे या बाबतची जनजागृती करणेत यावी व वृक्षारोपन करुन घेणेत यावे . तसेच मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर यांचे निर्देशानुसार प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांनी 10 वृक्षारोपन करुन सात दिवसाचे आत अहवाल तहसिल कार्यालय सांगोला येथे फोटो प्रतिसह सादर करावा . तसेच वृक्षारोपनाबाबत तहसिल कार्यालयचे पथकामार्फत वस्तुस्थितीची तपासणी करणेत येईल याची नोंद घ्यावी .
0 Comments