लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने नर्सवर केला बलात्कार
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने नर्सवर बलात्कार केल्याची घटना आहे. मुंबईमधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असलेले डॉ. निखील जॉन व संबंधित परिचारिका यांची सन २०१४ मध्ये छत्तीसगडमध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते.भेटीचे प्रेमात रूपांतर झाले होते. यानंतर डॉ. निखिल जॉन यांनी सदर महिलेला लग्न करण्याचे वचन देत तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले होते. काही दिवसांनंतर सदर परिचारिकेने डॉक्टरकडे लग्न करण्याचा विषय काढला असता, डॉक्टरांनी लग्न करण्यास नकार दिला होता.त्यामुळे पीडित परिचारिकेने शुक्रवारी संध्याकाळी बांद्रा पोलीस ठाण्यात जाऊन डॉक्टरच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. परिचारिकेने दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड सहिता कलम ३७६ नुसार डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
0 Comments