ग्रामीण पोलिस स्टेशन , करकंब विषय - टेंभुर्णी ता.माढा येथील मातंग महिलांना मानवी विष्टा उचलायला लावणाऱ्या पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना निलंबित करनेबाबत .
महोदय- वरील विषयास अनुसरून निवेदन देतो की , मादाता , टेंभुर्णी येथे मातंग समाजातील महिलांना मिटिंग आहे असे खोटे सांगून या महिलांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून तुम्ही ही विष्टा केली आहे.असे धमकातुन यांच्याकडून जबरदस्तीने मानवी व जनावराची विष्टा धक्का - बुक्की व बळाचा वापर करून उचलण्यास भाग पाडले हे अनधीकृत्य पो . नि राजकुमार केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे या घटनेला महिना झाला तरी कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा चौकशी झालेली नाही .सदर पो.नि निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या कृत्यात सामील असणान्या संबंधीतावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल शहर अध्यक्ष पंढरपूर श्री. अमोल खिलारे,श्री रमेश कांबळे जि.उपाध्यक्ष, श्री पांडुरंग खिलारे बसपा जिल्हा अध्यक्ष, सौ.छाया पवार महिला आघाडी ता.अध्यक्ष, श्री नारायण गायकवाड जिल्हा अध्यक्ष
0 Comments