हलदहिवडी येथील मुलीच्या खून प्रकरणी मुलीच्या आजोबा व चुलतीस अटक
सांगोला : हलदहीवडी ता. सांगोला, जि. सोलापूर येथील दिनांक ०६ रोजी झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खुनप्रकरणी संशयित म्हणून मुलीचे आजोबा व मुलीच्या चुलतीस सांगोला पोलिसांनी अटक केली असून त्यांना दिनांक १५ रोजी सांगोला न्यायालयात हजार करण्यात येणार असल्याचे सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, हलदहिवडी येथील अमोल बापूराव फाळके यांची मुलगी जान्हवी हिचा त्यांच्यावस्तीपासून एक किमी अंतरावर असणाऱ्या चांगदेव तातोबा चव्हाण यांच्या शेतातील पाणी साचलेल्या मोठ्या खड्यात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जीवे ठार मारून खून करण्यात आला होता. याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत सदर मुलीचा खून कोणी व कसा केला याबाबत सांगोला पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने संयुक्तीक तपास चालू होता.
0 Comments