google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! मंगळवेढयात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Breaking News

खळबळजनक! मंगळवेढयात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

खळबळजनक! मंगळवेढयात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक


मंगळवेढा शहरातील नागणेवाडी परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या अमर महादेव चव्हाण (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेवून ३९० गांजा जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील आरोपी अमर चव्हाण (रा.नागणेवाडी) हा दि.२७ रोजी ६.२० च्या दरम्यान दामाजी कारखाना रोडवरील बसस्टॉपजवळ अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळता त्यांनी चव्हाण याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ हजार रुपये किमतीचा ३९० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.याची फिर्याद सोलापूर पोलिस मुख्यालयाचे सहाय्यक फौजदार सुधीर गायकवाड यांनी दिली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments