जखमी तक्रारदारास परस्पर वैद्यकीय तपासणीकामी पाठवू नये – हेमंत नगराळे
जखमी तक्रारदार व्यक्ती ज्यावेळी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याकामी येते त्यावेळी त्या तक्रारदारास कित्येकदा परस्पर रुग्णालयात रवाना केले जाते. एवढेच नव्हे तर त्या जखमी व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देखील घेऊन येण्यास सांगितले जाते. मात्र हा प्रकार पोलिस नियमांना सोडून असल्याचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. असा प्रकार यापुढे चालणार नसल्याचे देखील नगराळे यांनी बजावले आहे. जखमी व्यक्तीसोबत एका पोलिस कर्मचा-याला पाठवण्याचा आदेश पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढला आहे.जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास त्याला तातडीने मेडीकल मेमो देऊन तशी नोंद स्टेशन डायरीला घेऊन एका अंमलदारासोबत त्याला रुग्णालयात रवाना करावे. वैद्यकीय उपचार आटोपल्यानंतर त्याची तक्रार नोंदवून घेतली जावी. तसे झाले नाही तर संबंधितावर कायदेशीर कारवाईचा इशाराच पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून देण्यात आला आहे.
0 Comments