google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूर : कोविड सेंटरमध्ये बलात्कारप्रकरणी वॉर्डबॉयला अटक

Breaking News

कोल्हापूर : कोविड सेंटरमध्ये बलात्कारप्रकरणी वॉर्डबॉयला अटक

 कोल्हापूर : कोविड सेंटरमध्ये बलात्कारप्रकरणी वॉर्डबॉयला अटक 


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीतील कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीशी जवळीक करुन तिच्याशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली . अंकूश मच्छिंद्र पवार ( वय २१ , रा . तीनबत्ती चौक , दौलतनगर ) असे संशयिताचे नाव आहे . संशयित वॉर्डबॉयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याला १ ९ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . एका समाजिक संस्थेत अनाथ म्हणून दाखल असणारी ही मुलगी अल्पवयीन आहे . तिला कोरोनाची बाधा झाल्याने २० मे रोजी शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीत महापालिकेअंतर्गत सुरु असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते . उपचारादरम्यान येथे वॉर्डबॉय म्हणून कंत्राटी काम करणाऱ्या अंकूश पवारने तिच्याशी जवळीक साधली . तो विवाहीत असतानाही अविवाहीत असल्याचे सांगून पीडित मुलीशीलगट केली . तिच्याजवळ वारंवार येवून तो गोडीगुलाबीने बोलत होता . उपचारादरम्यान , २ ९ मे रोजी त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला . संस्थेत परतल्यानंतर प्रकार उघड उपचार घेवून पीडित मुलगी संस्थेत परतली . याठिकाणी ती शांत - शांत राहत असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्याशी संवाद साधला . यावेळी तिने कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार सांगितला . त्यांनी हा प्रकार तत्काळ बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिला . समितीने या घटनेची शहानिशा करुन राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली . याप्रकरणी संशयीत वॉडबॉय अंकूश पवार याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व अत्याचारप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी मध्यरात्री त्याला अटक केली .

Post a Comment

0 Comments