google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्रीय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा : खंडू सातपुते

Breaking News

केंद्रीय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा : खंडू सातपुते

 केंद्रीय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा : खंडू सातपुते


सांगोला / प्रतिनिधी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सामाजिक न्याय व सबलीकर विभागातून डॉ . बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रिपाईचे सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी केले आहे . केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील डॉ . बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन १५ जनपथ नवी दिल्ली ११०००१ यांच्यावतीने अनुजाती ( एस.सी. ) व अनुसूची जमाती ( एस.टी. ) रूग्णांसाठी हृदय शस्त्रक्रि यासाठी १.२५ लाख , किडनीसाठी ३.५० लाख कर्करोग , - किमीथेरपी , रेडीओ थेरपीसाठी १.७५ लाख ,मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी १.५ लाख अवयन प्रत्यार्पणासाठी ३.५ लाख , कणाच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख तसेच जिवघेण्या आजारासाठी १ लाख अशी आर्थिक मदत मिळते . या मदतीच्या लाभासाठी रूग्ण अनु.जाती एस.सी व जनुसूचित जमातीचा असावा . वार्षिक उत्पन्न ३ लाख असावे . अर्ज करताना जातीचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , रेशनकार्ड आधारकार्ड , व वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले खर्चाचे प्रमाणपत्र जोडून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी डायरेक्टर डॉ . बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन १५ जनपथ नवी दिल्ली ११०००१ या पत्यावर १५ दिवस अगोदर अर्ज करावे ०११ २३३२०५७१ , ०११-२३३२०५८९ या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधा व . त सच www drambedkarfoundation.nic.in या वेबसाईटवर जावून सविस्तर माहिती घेवून सांगोला तालुक्यातील अनु . जाती व जमातीच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खंडू सातपुते यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments